| भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता संघर्ष करणा.या प्रमुख महापुरूषांमधे जवाहरलाल नेहरू हे एक होते. ज्यांना आपण पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) वा चाचा नेहरू (Chacha Nehru) या नावांनी देखील ओळखतो. आपल्या भाषणांनी त्यांनी लोकांची मने जिंकली होती या मुळेच ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले या महान पुरूषा च्या जीवनासंबंधी काही महत्वपुर्ण माहिती.
पंडित
जवाहरलाल नेहरू | |||||||||||||||||||||||
भारताचे १ ले पंतप्रधान
| |||||||||||||||||||||||
| कार्यकाळ ऑगस्ट १५, इ.स. १९४७ – मे २७, इ.स. १९६४ | |||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले.
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.
१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकालीन पण शेवटची ठरली. एकंदर पंडित नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
नेहरूंनी लिहिलेली पुस्तके
- आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - ना.ग. गोरे)
- इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)
- भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - साने गुरुजी)
नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके
- अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे)
- आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील)
- आपले नेहरू (बालवाङ्मय, लेखक - साने गुरुजी)
- गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी)
- जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)
- नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)
- नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवादक - अवधूत डोंगरे]]
- नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - करुणा गोखले)
- नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)
- पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे)
- पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्मय, लेखक - राजा मंगळवेढेकर)
- पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार)
- पंडित नेहरू (पु. शं. पतके)
- भारताचे पहिले पंतप्रधान (यशवंत गोपाळ भावे)
पं. जवाहरलाल नेहरू यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती
- 1912 मधे इंग्लंड येथुन परतल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आपल्या वडिलांचा ज्युनियर बनुन अलाहाबाद उच्च न्यायालयात वकीलीचा व्यवसाय सुरू केला.
- 1916 राजकारणात येण्याच्या उद्देशाने पंडित नेहरू गांधीजींना भेटले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी व्हावे अशी त्यांची ईच्छा होती.
- 1916 मधे त्यांनी डाॅ. अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीत प्रवेश घेतला, पुढे 1918 ला ते या संघटनेचे सेक्रेटरी झाले शिवाय भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस च्या कार्यात देखील त्यांनी सहभाग घेतला.
- 1920 ला महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात नेहरूजी सहभागी झाले. यामुळे त्यांना सहा वर्षांची कैद झाली.
- 1922.23 नेहरूजी अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष निवडल्या गेले.
- 1927 ला पं. नेहरू यांची सोव्हियत युनियन बरोबर भेट झाली. समाजवाद प्रयोगाने ते प्रभावित झाले आणि त्या विचारांकडे खेचले गेले.
- 1929 ला लाहौर इथं झालेल्या राष्ट्रिय काॅंग्रेस च्या ऐतिहासीक अधिवेशनाचे ते अध्यक्ष निवडल्या गेले. याच अधिवेशनात काॅंग्रेस ने संपुर्ण स्वातंत्र्याची मागणी लावुन धरली. या अधिवेशनानेच भारताला स्वतंत्र बनविण्याचा निर्णय घेतला. नंतर ‘संपुर्ण स्वातंत्र्याचा’ संकल्प पास करण्यात आला.
- हा निर्णय संपुर्ण भारतात पोहोचवण्याकरता 26 जानेवारी 1930 हा दिवस राष्ट्रीय सभेत ठरविण्यात आला. प्रत्येक गावांमधे मोठया सभांचे आयोजन करण्यात आले सामान्य जनांनी स्वातंत्र्या करता लढण्याच्या शपथा घेतल्या. म्हणुन 26 जानेवारी हा दिवस महत्वाचा मानला जातो.
- 1930 ला महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले ज्याला पं. नेहरूंनी पाठिंबा देणे महत्वाचे मानले गेले.
- 1937 ला काॅंगे्रस ने प्राथमिक कायदे मंडळाची निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि भरपुर यश देखील मिळवले त्याच्या प्रचाराचा भार पं. नेहरूंच्या खांद्यावर होता.
- 1942 ला ’चले जाओ आंदोलनाला Quit India Movement भारतिय स्वातंत्र्य संग्रामात विशेष दर्जा आहे. काॅंग्रेस ने हे आंदोलन सुरू करावयास हवे याकरता गांधीजींना तयार करण्यासाठी पं. नेहरू पुढे आले. त्यानंतर लगेच सरकारनं त्यांना कैद करून अहमदनगर जेल मधे टाकले तिथेच त्यांनी डिस्कव्हरी आॅफ इंडिया हा ग्रंथ लिहीला.
- 1946 ला स्थापीत झालेल्या अंतरिम सरकारने पंतप्रधान रूपात नेहरूंजींना निवडले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे ते पहिले प्रधानमंत्री झाले. मृत्यु पर्यंत ते या पदावर राहिले 1950 ला नेहरूजींनी नियोजन आयोगाची स्थापना केली.
पंडित जवाहरलाल नेहरू Jawaharlal Nehru उर्फ चाचा नेहरू Chacha Nehru यांनी आपल्या जीवनात कधीही हार मानली नाही. ते सतत भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता इंग्रजांशी लढत राहीले. एक यशस्वी आणि पराक्रमी नेता अशी त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. ते नेहमी गांधीजींच्या आदर्शांवर चालत राहिले. त्यांचा नेहमी हा विचार होता.
पं. जवाहरलाल नेहरूंचा मृत्यु – Jawaharlal Nehru Death
चिन सोबतच्या संघर्षानंतर काही दिवसात नेहरूजींची प्रकृती बिघडली, त्यानंतर 27 मे 1964 ल ह्नदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
No comments:
Post a Comment